Venue: Shop No. 2, Adarsh Park-1, Kalptaru Greens, Near Sarthak Weigh Bridge, Manjari Budruk, Pune – 412307
Date: 21 Feb, 2026 | Time: 09:00 AM
फिनकेअर सोशल फाउंडेशन व ओम स्पाईन केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंज़री बुद्रुक, पुणे येथे दिनांक २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेत दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांना सुलभ, मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामध्ये डॉ. किरण गजधने (BHMS, MD) तसेच पारंपरिक वैद्य, फिजिओथेरपिस्ट व योग तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार देणार आहेत. शिबिरात होमिओपॅथी, आयुर्वेदिक नाडीपरीक्षण, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिस, अॅक्युपंक्चर, कपिंग थेरपी, न्युरोथेरपी तसेच योग व निसर्गोपचार मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे.
पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, सायटिका, स्लिप डिस्क, मायग्रेन, फ्रोजन शोल्डर, लकवा, मणक्याचे विकार इत्यादी दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. तसेच आरोग्य जनजागृतीसाठी व्यायाम व योगासनांचे मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
तरी मंज़री बुद्रुक व परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.