वृत्त
दत्तनगरीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व भारत माता पुजन उत्साहात साजरा
काल दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी वार शुक्रवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मांजरी गावचे मा.उपसरपंच अमित (आबा ) घुले यांच्या शुभहस्ते भारत माता पुजन व भारतीय सैन्य दलातील कार्यरत असलेले जवान हवालदार वीरभद्र व हवालदार स्वेन सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले यावेळी दत्तनगरीतिल सैनिक, ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक, माता भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते नंतर मान्यवरांचे भाषण झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर मास्टर लिटिल लँड स्कुलच्या लहान बालकांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला नगरीतील विद्यार्थ्यांचा मैदानी खेळामध्ये दांडपट्टा व दंड प्रयोग झाले दत्तनगरीतील काही तरूणांनी एकत्र येऊन फिनकेअर केअर सोशल फाउंडेशन ची स्थापना करून या फाउंडेशनच्या वतीने दहावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच फाउंडेशन च्या वतीने शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल रतनताई जगताप यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता चहापाण व अल्पोपहाराने झाली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप सुर्यवंशी साहेब यांनी केले