मांजरी येथे भव्य मोफत आरोग्य व उपचार शिबिराची यशस्वी सांगता!

मांजरी येथे भव्य मोफत आरोग्य व उपचार शिबिराची यशस्वी सांगता!

ओम स्पाईन केअर आणि फिनकेअर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मांजरी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत आरोग्य व उपचार शिबिराला' नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसीय शिबिरामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी मोफत उपचारांचा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

तज्ज्ञांचे लाभलेले अनमोल मार्गदर्शन:
या शिबिरात रुग्णांना अचूक मार्गदर्शन आणि उत्तम वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आम्ही खालील तज्ज्ञांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानतो:

वैद्य अर्जुन गवळी

डॉ. किरण गजदाने

वैद्य नागेश आकेन

वैद्य विकास उत्तेकर

फिजिओथेरपिस्ट दिगंबर गवळी

योगाचार्य विनय गुप्ता जी

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती व सत्कार सोहळा:
केशवनगर, मांजरी आणि शेवाळवाडीचे प्रथम नगरसेवक मा. दादासाहेब कोद्रे आणि मा. वंदनाताई कोद्रे यांच्या शुभहस्ते याप्रसंगी वैद्यकीय टीमचा आणि आयोजकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, मा. विशाल मस्के आणि नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती नंदाताई अबनावे यांनी शिबिराला आवर्जून सदिच्छा भेट दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आयोजनातील मोलाचे योगदान:
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फिनकेअर सोशल फाउंडेशनचे प्रफुल बिजावे, राजू चोपडे, राहुल बनसोडे ओम स्पाईन केअरचे वैद्य अर्जुन गवळी आणि टीम यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.
सर्वांच्या भक्कम पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! समाजाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आमची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहील.

ठिकाण: मांजरी, पुणे

दिनांक: २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६